रविवारी मुंबई पोलिस अॅक्शन मोडमध्ये, वाहनचालकांना जबरदस्त दणका

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 29 जून 2020

संचारबंदी असताना ही अनेक जण विनाकारण गाड्या घेऊन मुंबई फिरत असल्याचं आढळून आलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडक पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. 

 

मुंबई- कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. अशात मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रार्दुभाव झाला आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात असताना अनेक जण सर्रास रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसतात. संचारबंदी असताना ही अनेक जण विनाकारण गाड्या घेऊन मुंबई फिरत असल्याचं आढळून आलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडक पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. 

प्लाझ्मा थेरेपी ठरतेय गुणकारी; नायर रुग्णालयातून तब्बल 'इतके' रुग्ण कोरोनामुक्त...

घरापासून 2 किलोमीटरच्या पुढे गेल्यास पोलिस नाकाबंदीत वाहने जप्त करताहेत. रविवारी पोलिसांनी दिवसभरात तब्बल 7 हजार 75 वाहने जप्त केली आहेत. एका दिवसात एवढ्या मोठ्याप्रमाणात गाड्या जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पोलिसांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. मुंबई पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटलं की, 28 जूनला 7000 हून अधिक नागरिकांनी औपचारिक/वैद्यकीय कारण किंवा आपत्कालीन परिस्थिती नसताना वाहने बाहेर काढून टप्प्याटप्प्याने होत असलेल्या अनलॉकच्या नियमांचे उल्लंघन केले. शहर व्यवस्थितपणे 'अनलॉक' करण्यासाठी मुंबईकर सर्व नियमांचे पालन करून आम्हाला साथ देतील अशी आम्ही आशा करतो.

संतप्त मूर्तिकार आंदोलनाच्या पवित्र्यात, मंडप परवानगीसाठी सरकारकडून अजूनही निर्देश नाही..

सरकारनं काही निर्बंध शिथिल करताच नागरिक मोठ्या संख्येनं वाहने घेऊन रस्त्यावर गर्दी करू लागलेत. अशाच बेजबाबदार नागरिकांविरोधात पोलिसांनी आता कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 

मुंबईत रविवारी पोलिसांनी नाकाबंदी लावली. या नाकाबंदीत तब्बल 7 हजार 75 वाहनांवर कारवाई केली. विनाकारण बाहेर पडणाऱ्या बेजबाबदार नागरिकांना चाप बसावा यासाठी पोलिसांनी ही मोहिम सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. 

सर्वाधिक कारवाई उत्तर विभागात करण्यात आली. त्यामधील 22 ठिकाणी केलेल्या नाकाबंदीत 1306 वाहने जप्त केली आहे. त्यात अनेक महागड्या गाड्यांचाही समावेश आहे. लॉकडाऊन काळात विनाकारण रस्त्यावर वाहन घेऊन निघणाऱ्यांवर रविवारी कारवाई केली. अतिरिक्त आयुक्त दिलीप सावंत यांच्यासोबत परिमंडळ 11 चे पोलिस उपायुक्त डॉ. मोहन दहिकर आणि परिमंडळ 12 चे उपायुक्त डी. एस. स्वामी यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी सायंकाळपर्यंत रस्त्यावर कारवाई करत होते.

पुनःश्च हरिओम.. मुंबईकरांनो, दोन किलोमीटरपुढे जाऊ नका; वाचा कोणी केलंय आवाहन

परिमंडल 10 परिसरात मोठी कारवाई
सर्वाधिक कारवाई अंधेरी येथील परिमंडळ 10 अंतर्गत करण्यात आल्या. या परिसरात 1297 गाड्या जप्त करण्यात आल्या. मालाड, गोरेगाव परिसरात 558, तर बोरीवली परिसरातून 748 वाहने जप्त करण्यात आली. पोलिसांनी दहिसर ते गोरेगाव परिसरात 22 ठिकाणी नाकाबंदी लावून 1306 वाहने जप्त करत कलम 188 नुसार गुन्हे दाखल केले आहेत.

---------------------------------------------------

कुठे, किती वाहनांवर जप्ती

कफपरेड, कुलाबा, मरीनड्राइव्ह, आझाद मैदान, माता रमाबाई मार्ग, डोंगरी, आणि जेजे मार्ग पोलिस ठाणे परिसर (झोन 1) - 229 गाड्या जप्त 

एल.टी.मार्ग. व्हि.पी.रोड, डाँ. डीबीमार्ग, पायधुनी, गामदेवी, मलबार हिल परिसर (झोन 2)-  377 वाहने जप्त

झोन 3 ( ताडदेव, नागपाडा, आग्रीपाडा, भायखळा, वरळी, ना.म.जोशी मार्ग परिसर) -108 वाहने जप्त

काळाचौकी, भोईवाडा, माटुंगा, सायन, आर.ए.किडवाई, वडाळा, अँण्टाप हिल परिसर (झोन 4) - 290 वाहने जप्त 

दादर, शिवाजीपार्क, माहिम, शाहू नगर, धारावी, कुर्ला, विनोबा भावे नगर, परिसर (झोन 5) - 300 वाहने जप्त

चेंबूर, नेहरूनगर, चुन्नाभट्टी, गोवंडी, ट्राँम्बे, आरसीएफ, मानखुर्द, देवनार, शिवाजीनगर, टिळक नगर परिसर (झोन 6)- 226 वाहने जप्त

नवघर, कांजूरमार्ग, भांडुप, पार्कसाईट, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, पंतनगर परिसर (झोन 7) - 334 वाहने जप्त

वांद्रे (बीकेसी), खेरवाडी, निर्मलनगर, वाकोला, विलेपार्ले, सहार आणि विमानतळ परिसर (झोन 8)-  212 वाहने जप्त

वांद्रे (पश्चिम), खार, सांताक्रूझ, जुहू, डी.एन.नगर, वर्सोवा, ओशिवरा, अंबोली परिसर (झोन 9) -  257 वाहने जप्त

साकीनाका, पवई, अंधेरी, जोगेश्वरी, मेघवाडी, एमआयडीसी परिसर (झोन 10)-  1297 वाहने जप्त

मालवणी, बोरिवली, गोरेगाव, मालाड, एमएचबी, चारकोप, बांगूरनगर, गोराई, कांदिवली (झोन 11)-  558 वाहने जप्त

वनराई, आरे, दिंडोशी, कुरार, समतानगर, कस्तुरबा, दहिसर (झोन 12)- 748 वाहने जप्त

पोर्ट झोन म्हणजेच वडाळा, शिवडी, यलोगेट, मुंबई सागरी 1, मुंबई सागरी 2 परिसरात 139 वाहने पोलिसांकडून जप्त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It has been found that many of them were traveling in Mumbai without any reason during the curfew. Mumbai Police has started taking action against this background.