प्लाझ्मा थेरेपी ठरतेय गुणकारी; नायर रुग्णालयातून तब्बल 'इतके' रुग्ण कोरोनामुक्त...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 June 2020

कोरोनाचा उद्रेक झाल्यावर मुंबई महापालिकेचे मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय हे पूर्णपणे कोरोनाच्या उपचारांसाठी देण्यात आले. कोरोना रुग्णांना तात्काळ उपचार उपलब्ध व्हावे, म्हणून सरकार अनेक पर्याय शोधत आहे.

मुंबई : कोरोनाचा उद्रेक झाल्यावर मुंबई महापालिकेचे मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय हे पूर्णपणे कोरोनाच्या उपचारांसाठी देण्यात आले. कोरोना रुग्णांना तात्काळ उपचार उपलब्ध व्हावे, म्हणून सरकार अनेक पर्याय शोधत आहे. अशातच नायर रुग्णालयात प्लाझ्मा थेरेपी सुरू करण्यात आली. या थेरेपीद्वारे कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. 

सकाळ IMPACT: आच्छाड तपासणी नाका प्रकरणात चौकशीचे आदेश; परिवहन विभागात मोठी खळबळ...

आतापर्यंत नायर रुग्णालयात एकूण 15 रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करण्यात आला. त्यांना कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. शनिवारपर्यंत नायर रुग्णालयात आणखी 11 कोरोनाबाधित रुग्ण प्लाझ्मा थेरेपीने मुक्त झाले. आणि याआधी 4 रुग्णांवर या थेरेपीचा सकारात्मक परिणाम झालेला दिसून आला. त्यानुसार, प्लाझ्मा थेरेपीने बरं होण्याची संख्या 15 वर पोहोचली असल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली आहे. 

कोरोनावर उपचाराची ट्रेनिंग घेतली 1 लाख डॉक्टरांनी, नोंदणी फक्त 1500 जणांची...

दरम्यान, प्लाझ्मा थेरेपीचा सकारात्मक फायदा रुग्णांवर होत असून नायरनंतर केईएम, सायन, कस्तुरबा आणि आता राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालयात ही प्लाझ्मा थेरेपीसाठी अँटीबॉडीज घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर एका कोरोनामुक्त रूग्णाचा प्लाझ्माही घेण्यात आला आहे. त्यासाठी आयसीएमआर, एफडीए या सर्व महत्वाच्या विभागातून परवानगी घेण्यात आली आहे. 

1 जुलैपासून मुंबईत काय असेल, लॉकडाऊन की अनलॉक 2?...असा असू शकेल अनलॉक-2

प्लाझ्मा थेरेपीमध्ये एका निरोगी व्यक्तीकडून आजारी व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण करून रुग्णाचा आजार बरा करण्यास मदत करते. या थेरपीमध्ये कोरोना व्हायरसवर मात केलेल्या रुग्णाकडून गंभीर स्वरूपात आजारी असलेल्या व्यक्तीच्या उपचारासाठी अ‍ॅंटीबॉडीज तत्वाचा वापर केला जातो. बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातील घटक आजारी रुग्णाच्या रोग प्रतिकारकशक्तीला बळ देतात. जगभरात कोणतेही प्रमाणित उपचार उपलब्ध नसल्याने या आजारावर उपचार करण्यासाठी अनेक औषधे आणि थेरपी एकत्रितपणे वापरल्या जात आहेत.

सुशांतच्या आत्महत्येस कारण की... काय म्हणताहेत संजय राऊत, वाचा

 

केईएम रुग्णालयातून बरे होऊन घरी परतललेल्यांपैकी 3 ते 4 रुग्णांची अँन्टीबाॅडीज घेण्यात आल्या आहेत. रुग्णांच्या आवश्यकतेनुसार ते त्यांना दिले जातील. रुग्ण बरा झाला की 4 आठवड्यानंतर त्यांना अँन्टीबाॅडीज दान करायला सांगितलं जातं
- डाॅ.  हेमंत देशमुख, अधिष्ठाता,  केईएम रुग्णालय

पालिकेच्या सायन रूग्णालयातही आतापर्यंत 5 कोरोनामुक्त रूग्णांकडून अँटीबॉडीजसह प्लाझ्मा घेण्यात आला आहे. सायन रुग्णालयातील मेडिसीन विभागाने यात पुढाकार घेत आयसीएमआरच्या नियमावलीप्रमाणे रक्तगटनुसार कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची जमवाजमव करण्याचे काम सुरू केले आहे. 
- डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, सायन रुग्णालय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many corona patients cured in nair hospital by using plazma therapy...