esakal | दिवाळीनंतरही शाळा सुरू करणे अशक्‍यच; शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने लस आल्याशिवाय शाळा सुरू करू नये, अशी मागणी होऊ लागली आहे. दिवाळीनंतर कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत.

दिवाळीनंतरही शाळा सुरू करणे अशक्‍यच; शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची माहिती

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई : कोरोनामुळे राज्यातील शाळा-महाविद्यालये बंद आहेत. दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे संकेत शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. दिवाळीनंतरही कोरोनाचे संक्रमण वाढतच राहिल्यास राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा सुरू करणे अशक्‍यच राहील, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.

शवागृहांत तब्बल ८५ मृतदेह बेवारस
 
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने लस आल्याशिवाय शाळा सुरू करू नये, अशी मागणी होऊ लागली आहे. दिवाळीनंतर कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. कोरोनाची वाढती परिस्थिती पाहता बच्चू कडू म्हणाले की, आपण ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये आणि आता दिवाळीनंतर शाळा सुरू करता येईल का, याचा विचार करत होतो. जर दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट आली आणि संक्रमण वाढले तर आपल्याला दिवाळीनंतरही शाळा बंद ठेवाव्या लागणार आहेत. 

कदाचित आतापेक्षा कोरोनाचे संक्रमण कमी झाले आणि आपल्याला वाटले शाळा सुरू करायला हरकत नाही तेव्हा शाळा सुरू करता येईल; परंतु आपण जगाचा विचार केला तर ब्रिटनमध्ये 13 हजार विद्यार्थी कोरोनाबाधित झाले आहेत, असेही राज्यमंत्री कडू म्हणाले.  

(संपादन- बापू सावंत)
 

loading image