esakal | शवागृहांत तब्बल 85 मृतदेह बेवारस; विल्हेवाट लावण्याचे BMCचे रुग्णालयांना निर्देश
sakal

बोलून बातमी शोधा

शवागृहांत तब्बल 85 मृतदेह बेवारस; विल्हेवाट लावण्याचे BMCचे रुग्णालयांना निर्देश
  • पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांत अनेक बेवारस मृतदेह पडून आहेत.
  • पालिकेच्या आरोग्य विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी नुकताच आढावा घेतला.

शवागृहांत तब्बल 85 मृतदेह बेवारस; विल्हेवाट लावण्याचे BMCचे रुग्णालयांना निर्देश

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांत अनेक बेवारस मृतदेह पडून आहेत. त्याचा पालिकेच्या आरोग्य विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी नुकताच आढावा घेतला. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश रुग्णालयांच्या अधिष्ठाता यांना देण्यात आले आहेत. 

ठाण्यात कोरोनाचा कहर, चार दिवसात 172 जणांचा कोरोनाने मृत्यू

पालिकेच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी या आठवड्यात आढाव बैठक घेतली. बैठकीत पालिकेच्या मोठ्या रुग्णालयांतील बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत रुग्णालयांच्या अधिष्ठाता यांना आवश्‍यक ते निर्देश दिल्याचे काकाणी यांनी सांगितले. पालिकेच्या सायन 45, नायर 25 तर केईएम रुग्णालयांत 15 बेवारस मृतदेह असल्याचेही त्यांनी सांगितले. 
हे मृतदेह गेल्या अनेक महिन्यांपासून शवागृहात पडून आहेत. त्यांच्यावर कुटुंबीय किंवा त्यांच्या नातेवाइकांनी दावा सांगितलेला नाही. त्यामुळे या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्यास कायदेशीर अडचणी येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांच्या मदतीने मृतदेहांची विल्हेवाट लावण्याच्या सूचना आपण केल्याचेही काकाणी यांनी सांगितले. 

पोलिसांना माहिती देऊन तसेच त्यांच्या मदतीने मृतदेहांची विल्हेवाट लावण्याच्या सूचना दिल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. पालिकेच्या अंधेरी येथील कूपर रुग्णालयात सर्वांत कमी बेवारस मृतदेह असल्याची माहिती देण्यात आली. 
घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयातील शवागृहात 15 मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. त्यात आणखी चार मृतदेह ठेवण्याची व्यवस्था आहे. याशिवाय शवागृहाच्या बाजूची एक खोली रिकामी करून त्यातही मृतदेह ठेवण्याची व्यवस्था केल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. कोव्हिडसंबंधी मृतदेहांवर तातडीने अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

 परतीच्या अवकाळी पावसात खालापूर-खोपोली परिसरात भातपिकांची नासाडी

संसर्ग टाळण्यासाठी अलगीकरण गरजेचे 
अनलॉक-5 नंतर लोकांचे घरातून बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक लोक कोरोना संसर्ग गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. त्यामुळे नवरात्री तसेच दिवाळीनंतर कोव्हिडबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्‍यता अधिक असल्याचे एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळेच शवागृहांसह ऑक्‍सिजन खाटांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. कोव्हिडमुळे एखाद्या मृतदेहाची विल्हेवाट 12 तासांच्या आत लावणे गरजेचे आहे; मात्र अनेकदा तसे होताना दिसत नाही. त्यामुळे संसर्ग पसरू नये त्यासाठी सर्वसाधारण रुग्णालयांत कोव्हिड तसेच नॉन कोव्हिड मृतदेह वेगवेगळे ठेवणे गरजेचे आहे. 

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image