काँग्रेसनेच शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

काँग्रेसनेच शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला : मंत्री रामदास आठवले

डोंबिवली : - महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. माजी केंदीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचा (NCP) जन्म काँग्रेसच्या (Congress) पाठीत खंजीर खुपसून झाला आहे असे वक्तव्य करीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाही अशी टीका केली होती. हे आरोप योग्य नसून 1998 मध्ये काँग्रेसने शरद पवारांना (Sharad Pawar) बाहेर काढले होते. त्यामुळे काँग्रेसनेच (Congress) पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे असे केंदीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

कल्याण पश्चिमेत केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले बुधवारी एका खासगी बैठकीसाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी गीते यांचे आरोप चुकीचे असल्याचे सांगितले. त्यावेळी आम्ही त्यांच्या सोबत होतो, त्यामुळे मला माहित आहे. काँग्रेसनेच त्यांना बाहेर काढले होते. जिल्हा परिषदेच्या निवडणूका फेब्रुवारी महिन्यात येऊ घातल्या आहेत. निवडणूक जवळ आल्याने महाविकास आघाडीतील स्थानिक पातळीवरील मतभेद समोर येत आहेत.

हेही वाचा: राज्यात पुढच्या ४८ तासात मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

राज्यात सूरु असलेल्या या आरोप प्रत्यारोपाबद्दल बोलताना आठवले म्हणाले, सध्या उलट सुलट आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे आघाडी सरकारने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. संजय राऊत खासदार आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते नेते आहेत. त्यांनी अशा प्रकारे आरोप करीत त्यात वेळ खर्ची करण्याची आवश्यकता नाही.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या अनेकांचे घोटाळे बाहेर काढत आहेत यावर आठवले म्हणाले, साखर कारखाने व इतर उद्योग करण्यास हरकत नाही. मात्र त्यात अनियमितता व भ्रष्टाचार नसावा. आरोप झालेले आमदार, मंत्री जर भाजपामध्ये गेले असतील तर इतरांनी त्यांच्याकडे असलेले पुरावे सादर करावेत.

loading image
go to top