esakal | ITI : राज्यात सुरु होणार, संचालनालयाकडून हिरवा कंदील
sakal

बोलून बातमी शोधा

ITI

राज्यात ITI सुरु होणार, संचालनालयाकडून हिरवा कंदील

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या अंतर्गत येणारी राज्यातील शासकीय आणि खाजगी अशा सर्व प्रकारची औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आयटीआय हे लवकरच सुरू होणार आहेत. यासाठी आज संचालनालयाने मान्यता (Permission) दिली आहे. राज्यात 417 शासकीय आणि 549 खाजगी अशा 966 आयटीआय आहेत.हे सर्व आयटीआय सुरु करण्यासाठी संचालनालयाकडून सरकारकडे (Government) विनंती करण्यात आली होती. त्या पार्श्‍वभूमीवर सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. ( ITI starts in Maharashtra permission given by Education Directorate-nss91)

कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने आज जीआर काढून सर्व आयटीआय सुरू केले जातील यासाठी मान्यता दिल्याचे जाहीर केले आहे. आयटीआय सुरू करण्यासाठी महाआरोग्य, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमअंतर्गत प्रशिक्षण संस्था सुरु करण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे त्यासाठी देण्यात असलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून हे आयटीआय सुरू करण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: अकरावी प्रवेशाची CET परीक्षा 21 ऑगस्टला, जाणून घ्या सविस्तर माहिती

यासोबत केंद्र सरकारव्दारे कोविड- १९ संबंधी वेळोवेळी दिलेल्या सूचना तसेच राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाव्दारे देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतत पालन केले जावे, यासाठी सामाजिक अंतर राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करुन प्रात्यक्षिक सत्र आयोजित केले जातील, याची दक्षता घेण्यात यावी असेही नमूद करण्यात आले आहे.

loading image