esakal | ITI प्रशिक्षणाला परवानगी पण लोकल प्रवासाची मुभा नाहीच!
sakal

बोलून बातमी शोधा

local train

ITI प्रशिक्षणाला परवानगी पण लोकल प्रवासाची मुभा नाहीच!

sakal_logo
By
संजीव भागवत

ठाकरे सरकारच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल

मुंबई: व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सरकारी, खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात असणारे विद्यार्थी व पालकांना प्रवासाची परवानगी नसल्याने संस्थेत दाखल कसे व्हायचे? रोज हजेरी कशी लावायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (ITI Students unhappy as Mahavikas Aghadi Govt Allows courses to start but Mumbai Local Train Journey not allowed vjb 91)

हेही वाचा: "हे बा विठ्ठला, जसे मुख्यमंत्री तुझ्या भेटीला आले तसेच..."

ITI चे प्रशिक्षण वर्ग गुरुवारी, 22 जुलैपासून सुरू करण्यासाठी संचालनालयाने आदेश जारी केले आहेत. मात्र मुंबई परिसरात विद्यार्थी तसेच शिक्षकांनाही लोकल प्रवासाची मुभा नसल्याने संस्था सुरू झाली तरी विद्यार्थी येणार कसे ही समस्या उभी राहिली आहे. ITI चे अनेक अभ्यासक्रम हे प्रॅक्टिकल्सवर आधारित असतात. हे विषय हजर राहूनच शिकवावे लागतात. त्याशिवाय, विद्यार्थ्यांना ते विषय समजणे कठीण जाऊ शकते. तसेच सप्टेंबर, आँक्टोबरमध्ये होणाऱ्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षेच्या दृष्टीनेदेखील संस्था सुरू होणे आवश्यक असून संस्था सुरू करताना कोरोना प्रतिबंधक नियामांचे पालन करणे आवश्यक असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

loading image