
मुंबई : दादर येथील कबुतरखान्यावर शनिवारी (ता. २) महापालिकेने कारवाई केली. याविरोधात जैन बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बंदिस्त केलेला कबुतरखाना उघडा करून कारवाई न थांबवल्यास येत्या १० ऑगस्टपासून जैन मुनींसह शेकडो कार्यकर्त्यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतल्याची माहिती स्थानिक माजी नगरसेवक पूरण दोशी यांनी दिली.