

Saphala to Virar waterway transported
ESakal
पालघर : महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जलसार जेटी (सफाळे) ते मारंबळपाडा (विरार) या जलमार्गावरील जलवाहतुकीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या १० महिन्यांत या सेवेद्वारे एक लाखाहून अधिक प्रवाशांसह ७८ हजार ४६० वाहने आणि सात हजार ५४५ जनावरांची सुरक्षित वाहतूक करण्यात आली. या जलमार्गामुळे वसई व पालघर तालुके थेट जोडले गेले असून, दोन्ही भागांतील प्रवाशांना जलद व सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे.