उल्हासनगर - प्रथम उल्हासनगर महानगरपालिकेत उपायुक्त आणि त्यानंतर अतिरिक्त आयुक्त पद हाताळणारे जमीर लेंगरेकर यांची फेब्रुवारी २०२५ मध्ये बदली झाली होती. मात्र लेंगरेकर यांना प्रतिक्षा यादीत ठेवण्यात आल्यावर त्यांची नंदुरबार जिल्हा सह आयुक्तपदी पदोन्नती झाल्याने त्यांच्या नियुक्तीची ४ महिन्यांची प्रतिक्षा संपली आहे. दरम्यान लेंगरेकर यांनी पदभार सोडल्यापासून पालिकेतील अतिरिक्त आयुक्त पद रिक्त असून त्यांच्या पुन्हा परतण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.