जनआशीर्वाद यात्रा आज नवी मुंबईत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा आज (सोमवारी) नवी मुंबईत पोहचणार आहे.

नवी मुंबई : शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा आज (सोमवारी) नवी मुंबईत पोहचणार आहे. या यात्रेदरम्यान बेलापूरपासून ते ऐरोलीपर्यंत शहरात ठिकठिकाणी युवा सेना प्रमुखांचे जंगी स्वागत होणार असून, त्यांच्या उपस्थितीत वाशी येथील सिडको एक्‍झिबिशन सेंटरमध्ये विजय संकल्प मेळावा पार पडणार आहे.

सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आदित्य ठाकरे यांचे सीबीडी बेलापूर येथे आगमन होणार आहे. त्यानंतर अर्बन हाटपासून नवी मुंबईतील जन आशीर्वाद यात्रेचा प्रारंभ होणार आहे. महापालिका मुख्यालय, सीवूडस सेक्‍टर ५०, नेरूळ, सेक्‍टर २८ मार्गे ही यात्रा नेरूळ येथील बालाजी मंदिरात पोहोचेल. तिथे बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर नेरूळ, सेक्‍टर १८, चिंचोली तलाव, जुईनगर, मिलेनिम टॉवरमार्गे ही यात्रा सानपाडा येथे पोहचणार आहे. सानपाडा पोलिस ठाणे चौकात युवा सेनाप्रमुखांचे भव्य स्वागत होणार आहे. त्यानंतर सिडको एक्‍झिबिशन सेंटरच्या पहिल्या माळ्यावर आयोजित करण्यात आलेल्या विजय संकल्प मेळाव्याला ते संबोधित करतील. त्यानंतर ही यात्रा वाशी, कोपरखैरणे, घणसोलीमार्गे ऐरोलीकडे रवाना होणार आहे. त्यानंतर ही जनआशीर्वाद यात्रा वसईला रवाना होणार आहे.

प्रमुख नेते सहभागी होणार
या यात्रेत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते- मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक सहभागी होणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jan aashiravad yatra is in Navi Mumbai today