कंगना राणावत विरोधात जावेद अख्तर कोर्टात ; जाणून घ्या प्रकरण

कंगनाने न्यायालयाची दिशाभूल केल्याचा जावेद अख्तर यांचा आऱोप
Kangana Ranaut
Kangana Ranautsakal media

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतच्या (kangana Ranuat) विरोधात दिग्दर्शक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) हस्तक्षेप याचिका केली आहे. कंगनाने जाणीवपूर्वक सत्य माहिती दडवून न्यायालयाची दिशाभूल केली आहे, असा आरोप अख्तर यांनी केला आहे. कंगनाने पारपत्र नूतनीकरण करण्यासाठी न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेवर सुनावणी दरम्यान तिच्या विरोधात न्यायालयात एकही फौजदारी खटला प्रलंबित नाही, असे विधान तिच्या वतीने तिचे वकील रिझवान सिद्दीकी Rizwan Siddiki) यांनी केले आहे. या विधानाची नोंद न्यायालयाने केली आहे आणि पारपत्र नूतनीकरणबाबत शक्य तितक्या जलदीने निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने पारपत्र विभागाला दिले आहेत. ( Javed Akhtar allegation on kangana ranaut hiding truth petition in high court)

Kangana Ranaut
कोरोनासह इतर आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंचा होणार अभ्यास- ICMR

या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी अख्तर यांनी वकील जय भारद्वाज यांच्या मार्फत याचिका केली आहे. कंगनाने खोटे, दिशाभूल करणारे आणि स्वतःचा फायदा करण्यासाठी विधान केले आहे. स्वतः अख्तर यांनी कंगना विरोधात न्यायालयात मानहानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे. त्यामुळे कंगनाच्या वकिलांनी केवळ दोन फौजदारी तक्रारींची माहिती न्यायालयात दिली आणि अख्तर यांनी केलेल्या खटल्याची माहिती दडवून ठेवली, असे याचिकेत म्हटले आहे. कंगनाला या खटल्याची माहिती आहे आणि तिने त्याबद्दल न्यायालयात सांगायला हवे होते, असेही अख्तर यांनी म्हटले आहे.

दिंडोशी सत्र न्यायालयात अख्तर यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अख्तर यांच्यावर आरोप केले आहेत. याबाबत हा खटला आहे. यामध्ये कंगनाने हजेरीही लावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com