esakal | जव्हारमध्ये लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा; लसीचा मात्र तुटवडा
sakal

बोलून बातमी शोधा

Jawhar corona vaccination

जव्हारमध्ये लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा; लसीचा मात्र तुटवडा

sakal_logo
By
भगवान खैरनार

मोखाडा : आदिवासी भागात (tribal area) कोरोना आणि लसीकरणा (corona vaccination) विषयी असलेले गैरसमज आणि भीती दुर झाली आहे. जव्हार तालुक्यात (Jawhar) लसीकरण करून घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक पुढे येत आहेत. मात्र, लसीचा तुटवडा (less vaccines) जाणवत असल्याने, नागरिकांना विन्मुख होऊन परतावे लागत आहे. तर अनेक भागात इंटरनेट सेवा (Internet Issue) ऊपलब्ध नसल्याने, लसीकरणाची नोंदणी करण्यास आरोग्य कर्मचाऱ्यांना (Health Department) जव्हार गाठावे लागत आहे. त्यामुळे कोलमडलेली इंटरनेट सेवा प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. 

हेही वाचा: मुंबई काँग्रेसकडून कोरोना योद्ध्यांचा गौरव; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

आदिवासी भागात कोरोणा आणि लसीकरणा विषयी अनेक गैरसमज आणि भीती होती. मात्र, आरोग्य विभाग, सामाजिक संस्था, विद्यार्थी आणि जव्हार मधील स्थानिक कलाकारांनी लघुपटाद्वारे जनजागृती केल्याने, येथील नागरीकांचे गैरसमज आणि भीती दुर झाली आहे. खेड्यापाड्यातील आदिवासी नागरीक आता लसीकरणासाठी पुढे येत आहेत. जव्हार मधील साखरशेत, जामसर, साकुर आणि नांदगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रांना तसेच झाप आरोग्य पथकाला प्रत्येकी  200  लसीचे डोस पुरविण्यात आले होते. येथे शनिवारी  4  सप्टेंबर ला लसीकरण करण्यात आले. मात्र, कोरोना विषयी जनजागृती झाल्याने प्रत्येक ठिकाणी  400  ते  500  नागरीकांनी लसीकरणासाठी ऊपस्थित झाले.

प्रचंड गर्दी झाल्याने आरोग्य प्रशासनही बुचकळ्यात पडले. मात्र,  200  लसीचे डोस ऊपलब्ध असल्याने, ऊर्वरित नागरीकांना विन्मुख होऊन परतावे लागले आहे. दरम्यान, अतिदुर्गम भागात इंटरनेट सेवा मिळत नसल्याने, लसीकरणात विलंब होत राहिला. तर काही ठिकाणी ही सेवाच मिळाली नसल्याने, तेथील कर्मचाऱ्यांनी लसीकरण आटोपून जव्हार तालुका मुख्यालय गाठले. तेथे त्यांनी सर्व लसीकरण लाभार्थ्यीची नोंदणी करून घेतली आहे. 

"लसीकरण लस ऊपलब्ध होते त्या पध्दतीने टप्प्या टप्प्याने करण्यात येत आहे. नागरीकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, इंटरनेट सेवा मिळत नसल्याने, लसीकरणात अडथळा येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जव्हार मध्ये येऊन लसीकरण लाभार्थ्यीची नोंदणी करावी लागते आहे."

- डाॅ. किरण पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, जव्हार. 

loading image
go to top