esakal | जव्हारमध्ये वादळाचा तडाखा | cyclone
sakal

बोलून बातमी शोधा

cyclone

जव्हारमध्ये वादळाचा तडाखा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मोखाडा : जव्हार (jawhar) तालुक्यात गेल्या तीन दिवसांत वादळासह (cyclone) झालेल्या पावसाने (heavy rainfall) दाणादाण उडवली आहे. यामध्ये चांभारशेत आरोग्य उपकेंद्राचे पत्र्याचे छप्पर उडाले असून, छपरावरील पत्रे (house collapse) थेट समोरील एका झोपडीवर आदळले. त्यामुळे घराचे मोठे नुकसान झाले.

हेही वाचा: राज्यातील कंत्राटी वीज कामगारांचे नोकरीत कायमत्वासाठी आझाद मैदानात धरणे

चांभारशेत आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीवरील पत्र्यांचे शेड लोखंडी पाईपसह उडाले. त्या शेडवरील पत्रे १०० मीटर अंतरावर असलेल्या नवसू बांबरे, बाबूलाल बांबरे, कृष्णा वरठा यांच्या घरावर आदळले. दरम्यान, नुकसानभरपाई मिळण्यासाठी तहसील कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला पत्र देऊन कळविले आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top