esakal | अनिल देशमुख ही मोगलाई नाही - जयश्री पाटील

बोलून बातमी शोधा

जयश्री पाटील-अनिल देशमुख
अनिल देशमुख ही मोगलाई नाही - जयश्री पाटील
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने FIR दाखल केला आहे. वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवरुन अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. अनिल देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याच्या निर्णयाचे वकील जयश्री पाटील यांनी स्वागत केले आहे.

"मी आधीच सांगितलं होतं, अनिल देशमुख ही मोगलाई नाही. तुम्ही मुगलांसारखे भ्रष्टाचार करुन या देशाला लुटू शकत नाही. हे संविधानाच, भारतीय कायद्याचं राज्य आहे. भारतमातेची अशा प्रकारे लुट करुन सुटू शकत नाही. तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील. सीबीआयने एफआयआर दाखल केलाय तो सिद्ध झालाय ही महाराष्ट्राच्या जनतेची जीत आहे. बिझनेसमनकडून लुट सुरु होती, त्या सगळयांची जीत आहे" अशी प्रतिक्रिया जयश्री पाटील यांनी दिली.

तपासात सीबीआयला कसं सहकार्य केलं, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, "मी सीबीआयला मलबार हिल पोलीस स्टेशनची कॉपी दिली. चौकशीत मदत केली. पुरावे सादर केले. म्हणून सीबीआयने गुन्हा दाखल करुन छापेमारी केली." "अनिल देशमुख यांना अटक झालीच पाहिले, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत" असे जयश्री पाटील म्हणाल्या.

हेही वाचा: वयाने दुप्पट असलेल्या महिलेवरील बलात्कार प्रकरण, तरुणाला जामीन मंजूर

राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. आज सकाळी सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर, त्यांनी सचिन वाझेला महिन्याला १०० कोटीच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. याच प्रकरणात उच्च न्यायालायच्या निर्देशांनुसार अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी सुरु होती.

हेही वाचा: "भ्रष्टाचार करताना कुठलीही लाज..."; भाजपचा घणाघात

आज सकाळी सीबीआयने या प्रकरणात अनिल देशमुख यांच्याविरोधात FIR दाखल केला. त्यानंतर त्यांच्या वांद्रे, वरळी, नागपूरसह १० ठिकाणी असलेली निवासस्थानं, कार्यालयांवर छापेमारीची कारवाई करण्यात आली.