Mumbai : उरणच्या किनाऱ्यावर जेलीफिश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jellyfish Uran

Mumbai : उरणच्या किनाऱ्यावर जेलीफिश

उरण : शासनाच्या नियमानुसार गेले दोन महिने मासेमारी बंद होती. त्यानंतर हवामानातील बदलांमुळे यंदा मासेमारीचा हंगामदेखील उशिराने सुरू झाला आहे. अशातच आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या मच्छीमारांसमोर आता विषारी जेलीफिशचे नवे संकट उभे ठाकल्याने उरणमधील मच्छीमारांची डोकेदुखी वाढली आहे.

मासेमारीचा व्यवसाय आता जिकिरीचा बनला आहे. डिझेल परतावा वेळेवर मिळत नसल्याने मासेमारी करणे कठीण झाले आहे. तसेच मजुरांच्या कमतरतेमुळे मच्छीमारांसमोरदेखील विविध अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. अशातच उरण परिसरात जेलीफिशचा वावर वाढल्याने मच्छीमारांच्या जीवितालाच धोका वाढला आहे. दिवसेंदिवस समुद्रातील वाढत असलेल्या प्रदूषणामुळे मासे मिळणे अवघड झाले आहे.

उरण : दोन महिन्यानंतर मासेमारी हंगामास सुरुवात झाली आहे, मात्र जेलीफिशमुळे मच्छीमारांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.

वातावरणात बदलांमुळे दरवर्षी जेलीफिश किनाऱ्यालगत येत असतात. या जेलीफिशमुळे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे खोल समुद्रात जाणे मच्छीमार टाळतात.वातावरणात बदलांमुळे जेलीफिश खाद्य शोधण्यासाठी किनाऱ्यालागत येत असतात. तसेच या जेलीफिशचा दंश जीवावरही बेतण्याचा धोका अधिक वाढला आहे.

टॅग्स :Mumbaijelly fish