जेट एअरवेज प्रकरणात हस्तक्षेपास कोर्टाचा नकार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

वाढत्या तोट्यामुळे बंद पडलेल्या जेट एअरवेजला पुनरुज्जीवित करण्याच्या मागणीची याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट नकार दिला. वकील मॅथ्यू नेंदुरपारा यांनी उच्च न्यायालयात ही याचिका केली होती.

मुंबई - वाढत्या तोट्यामुळे बंद पडलेल्या जेट एअरवेजला पुनरुज्जीवित करण्याच्या मागणीची याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट नकार दिला. वकील मॅथ्यू नेंदुरपारा यांनी उच्च न्यायालयात ही याचिका केली होती. जेट एअरवेजला पर्यायी गुंतवणूकदार मिळेपर्यंत रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर आजारी कंपनीला नवजीवन देण्यासाठी सरकार किंवा रिझर्व्ह बॅंकेला न्यायालय निर्देश देऊ शकत नाही, असे मुख्य न्यायाधीश न्या. प्रदीप नंदराजोग आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले; फार तर मदत मागण्याचे काम आपण करू शकतो, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. जेट एअरवेज नोंदणीकृत कंपनी असल्यामुळे राष्ट्रीय कंपनी विधी लवादाकडे दाद मागण्याची सूचना न्यायालयाने याचिकादाराला केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jet Airways Court