Jewellery Stolen from Women in Crowded Local Trains 21-Year-Old Woman Arrested
sakal
मुंबई - लोकलमध्ये महिलांच्या डब्यातील गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या २१ वर्षीय महिलेला ठाणे रेल्वे पोलिसांनी अटक केली. प्रियंका विशाल आहिरे असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून तीन गुन्ह्यांतील ३ लाख ४३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.