
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक विभागातील पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नजीब मुल्ला यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( शरदपवार) सरचिटणीस आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आका म्हणून उल्लेख केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जमीन शेख यांच्या खुनाच्या आरोपामध्ये नजीक मुल्ला यांचे नाव असताना दोषारोप पत्रामध्ये एका वगळले असा सवाल उपस्थित करत आव्हाड यांनी ही खळबळ उडवून दिली. 24 नोव्हेंबर 2020 रोजी मोटर सायकलवरून जात असताना जमील शेख यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला होता. या घटनेनंतर ठाण्यातील राजकीय क्षेत्रात दहशतीचे वातावरण पसरले होते.