Jitendra Awhad: मुघल आणि अफजल खान त्यांच्यासाठी देव; भाजप आमदाराचा टोला

Jitendra Awhad: आमचा राम जात-पात न मानणारा आहे, शबरीची बोरं खाणारा आहे, जे राम-राम करत आहेत त्यांना मी सांगेन की तुमचा राम तुम्हाला निवडणुकीसाठी बाजारात आणायचा आहे, आमचा राम आमच्या जन्मापासून आमच्या हृदयात आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसंच वाल्मिकी रामायणाचा दाखला देत जितेंद्र आव्हाड यांनी आपण काहीही चुकीचं बोललो नाही असंही म्हटलं आहे.
Jitendra Awhad ganpat gayakwad
Jitendra Awhad ganpat gayakwadsakal

Ganpat Gayakwad: राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतल्या मेळाव्यात राम मांसाहारी होता. 14 वर्षे वनवासात गेला होता. राम हा आमच्या बहुजनांचा राम आहे असे वक्तव्य केले आहे.

यावर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी आव्हाड यांना सणसणीत टोला लगावला आहे. "मुघल आणि अफजल खान त्यांच्यासाठी देव आहेत. बाकी हिंदू देवतांचा इतिहास त्यांना माहिती नाही. त्यामुळे त्यांना प्रभू रामचंद्र कोण होते हे त्यांना ज्ञात नसावे असे गायकवाड म्हणाले आहेत.

Jitendra Awhad ganpat gayakwad
Subhash Bhoir meet Ganpat Gaykwad: गणपत गायकवाड आणि सुभाष भोईरांची भेट, बंद दाराआड काय झाली चर्चा?

जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतल्या मेळाव्यात 14 वर्षे राम वनवासात गेला होता. राम मांसाहारी होता. राम हा आमच्या बहुजनांचा राम आहे. मी जे काही बोललो ते अभ्यासाशिवाय बोललो नाही असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

आमचा राम जात-पात न मानणारा आहे, शबरीची बोरं खाणारा आहे, जे राम-राम करत आहेत त्यांना मी सांगेन की तुमचा राम तुम्हाला निवडणुकीसाठी बाजारात आणायचा आहे, आमचा राम आमच्या जन्मापासून आमच्या हृदयात आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसंच वाल्मिकी रामायणाचा दाखला देत जितेंद्र आव्हाड यांनी आपण काहीही चुकीचं बोललो नाही असंही म्हटलं आहे.

Jitendra Awhad ganpat gayakwad
Ganpat Patil: अनेक भूमिका केल्या पण लक्षात राहिला तो 'नाच्या'.. असा होता गणपत पाटील यांचा संघर्षमय प्रवास..

आमदार आव्हाड यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी देखील आमदार गणपत गायकवाड यांच्यावर सडकून टीका केली आहे. आमदार गायकवाड म्हणाले, खरंतर आव्हाड यांना देशाचे साधुसंत, देव किंवा देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्याबद्दल विचारायचं नाही. त्यांचा इतिहास त्यांना माहिती नाही.

त्यांना फक्त मुघलांचा आणि अफजलखानाचा इतिहास विचारायचा. आणि ते मुघलांच्या बद्दल चांगले सांगतील. मुघल आणि अफजल खान त्यांच्यासाठी देव आहेत. बाकी हिंदू देवतांचा इतिहास त्यांना माहिती नाही. आणि ते पूजा करत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रभू रामचंद्र कोण होते हे त्यांना ज्ञात नसावे.

Jitendra Awhad ganpat gayakwad
Jitendra Awhad: मुलींना उचलून नेण्याची भाषा करणारे...त्यांचंही नाव 'राम'! आव्हाडांचा भाजप नेत्यावर हल्लाबोल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com