
डोंबिवली : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केडीएमसी प्रशासनाने मांस विक्रीवर घातलेल्या बंदीच्या निर्णयावरून महाराष्ट्रात राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयाविरोधात सरकार व प्रशासनावर जोरदार टीका केली. त्यांनी या निर्णयाला हुकूमशाही पद्धतीचा व समाजात फूट पाडणारा पाऊल असल्याचे म्हटले. तसेच आपल्या देशाची वाटचाल ही नॉर्थ कोरियाप्रमाणे हुकुमशाहीकडे सुरू असल्याची टिका करत त्यांनी या निर्णयाविरोधात कल्याण मध्ये मांसाहारी स्नेहभोजन केले.