तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

भाजपने मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडून ठेवले आहे. कल्याण डोंबिवलीत भाजप उतरायला तयार नाही, आणि ठाण्यात आम्हाला सीट पाहिजे याचा दबाव कायम ठेवलाय.
jitendra awhad over cm eknath shinde rebel mla shiv sena party maharashtra politics
jitendra awhad over cm eknath shinde rebel mla shiv sena party maharashtra politicsSakal

डोंबिवली - भाजपने मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडून ठेवले आहे. कल्याण डोंबिवलीत भाजप उतरायला तयार नाही, आणि ठाण्यात आम्हाला सीट पाहिजे याचा दबाव कायम ठेवलाय. आपल्या घरात आपण राजे असतो. परक्याच्या घरात नाही असेच काहीशी स्थिती होणार आहे. तुमचा वापर केला जाणार होता हे तुम्हाला आधीच कळायला पाहिजे होतं.

दुर्दैवाने ज्या घरात पंचपक्वान्न होते. ज्या घरात सोन्याच्या ताटात बसून जेवत होते. तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा निर्माण झाली. तुम्ही वाटोळे करून घेतलं अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यावर केली.

कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली.

आव्हाड पुढे म्हणाले, शरद पवारांच्या मृत्यूची प्रार्थना करतायेत, हे महाराष्ट्र सहन करणार नाही. राजकीय विरोध असू शकतो, पण कोणाच्या मरणाची इच्छा व्यक्त करणे याच्या सारखं खालच्या दर्जाचा विचार असू शकत नाही.

भाजपच्या 15 खासदारांनी स्टेजवर बोलताना संविधान बदलून टाकणार असे बोलले त्यानंतर हे सगळं अंगावर येतेय असं दिसल्यानंतर पुन्हा माघार घेतली. इलेक्ट्रॉन बॉण्ड प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आग्रही भूमिकेमुळे भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा भ्रष्टाचार बाहेर आला. लोकांचा मृत्यू झाला तरी चालेल आम्हाला इलेक्शन लढवायला पैसे द्या.

4 हजार 800 कोटी त्यांच्या बँकेत आहेत. बोरिवली ठाणे बोगदा, समृद्धी हायवेवरील एक रस्ता पंधराशे कोटींचा, दुसरा रस्ता सोळाशे कोटींचा. 31 हजाराच्या अगेन्स मेगा इंजिनिअरिंग ने एक हजार कोटी रुपये दिले. असा आरोप करत 'धंदा लो चंदा लो' हा धंदा चालू आहे. त्यामुळे बोलायला कोणतेच विषय नाहीत.

हे भटकती आत्मा, मंगळसूत्र,असे विषय निघत आहेत. मणिपूरच्या वेळेस मंगळसूत्र आठवले नाही का ? अस अचानक तुम्हाला स्त्री पण आठवलं असे सवाल करत वैयक्तिक बोलणार नाही पण स्त्री प्रेमावर बोलायचं अधिकार कोणाला असतो असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com