

Jitendra Awhad cirtcism on BJP
ESakal
ठाणे : राज्यात एमआयएमचा प्रभाव वाढत असल्यास त्यामागची कारणे भाजपने आत्मपरीक्षणातून शोधली पाहिजेत. सर्वत्र सामाजिक वातावरण बिघडवण्याचे काम भाजपच करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. ठाणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांची ठाण्यातील पक्ष कार्यालयात भेट घेतल्यानंतर आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही टीका केली.