बेशिस्त कार्यकर्त्यांची जितेंद्र आव्हाड यांनी काढली खरडपट्टी; गटबाजीबाबत भरला सज्जड दम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेशिस्त कार्यकर्त्यांची जितेंद्र आव्हाड यांनी काढली खरडपट्टी; गटबाजीबाबत भरला सज्जड दम
  • भिवंडीत राष्ट्रवादी च्या आढावा बैठकीत बेशिस्त कार्यकर्त्यांची  जितेंद्र आव्हाड यांनी काढली खरडपट्टी,
  • गटबाजी खपवून घेणार नाही दिला सज्जड इशारा..

बेशिस्त कार्यकर्त्यांची जितेंद्र आव्हाड यांनी काढली खरडपट्टी; गटबाजीबाबत भरला सज्जड दम

भिवंडी :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिस्तीने चालणार पक्ष असून कार्यकर्ते कमी असले तरी चालतील पण ते निष्ठावंत असावेत. त्यामुळे यापुढे कार्यकर्त्यांचा बेशिस्त गटबाजी सारखा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. असा सज्जड दम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व राज्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यांनी भिवंडीत झालेल्या कार्यक्रमात दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भिवंडी जिल्हा शाखेच्यावतीने आढावा काल सायंकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, शहराध्यक्ष भगवान टावरे, माहिलाध्यक्ष स्वाती कांबळे, अॅड.सुनील पाटील, वसीम खान आदी मान्यवर उपस्थित होते. 

गर्भवती महिलेच्या घटस्फोटासाठी कुलिंग कालावधी माफ: हायकोर्ट

 कार्यकर्त्यांच्या बेशिस्तपणामुळे स्टेज वर गर्दी, समोर खुर्च्या खाली हे चित्र समाधानकारक नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षाच्या नव्या जुन्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगत, फक्त बोलून पक्ष वाढत नाही. संघटन भिवंडीत पक्ष कमजोर आहे, सत्य स्विकारायला शिका, पुढे जाऊन त्रास होत नाही. गटबाजी कमी करा पक्षाला ताकद द्या ,कोणी कोठे ही जाऊ द्या जो जोपर्यंत पक्षाचे काम करतोय तो आपला ,जो पक्षाची गद्दारी करेल त्याला बाहेर चा रस्ता दाखवू असे स्पष्ट शब्दात सांगत पक्षाचा सन्मान वाढविणे सर्वांचे काम आहे. मी बेशिस्तपणा सहन करणार नाही असा सज्जड दम कार्यकर्त्यांना मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिला.

मुंबईत कोरोना नियंत्रणात, 6 दिवसात 1 हजार इमारती कोविड मुक्त

कार्यक्रमाच्या प्रारंभी भिवंडी शहरध्यक्ष भगवान टावरे यांनी प्रास्ताविकात भिवंडी शहरात पक्ष बांधणी करीत असताना विविध धर्मीय नागरीकांना विविध पक्षातील कार्यकर्त्यांना पक्षात स्थान देत पक्ष वाढी साठी प्रयत्न करीत असून शहरात जनाधार वाढत असल्याचे म्हटले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सरचिटणीस अॅड सुनील पाटील यांनी केले.

Jitendra Awhad scolded the unruly activists of ncp in bhivandi 

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top