सलाम! आतापर्यंत एक कोटी लोकांना दिलं मोफत जेवण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jivdani-Mandir-Trust

जीवदानी मंदिर ट्रस्टसह चार संस्थांनी मिळून कोरोनाकाळात दिला मदतीचा हात

सलाम! आतापर्यंत एक कोटी लोकांना दिलं मोफत जेवण

विरार (मुंबई): गेल्या एक वर्षापासून कोरोनाच्या (Coronavirus) काळात रुग्णांबरोबरच इतरांनाही जेवणाचा घास देणाऱ्या जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट (Jivdani Devi Mandir Trust) आणि इतर चार संस्थानी 1 करोड लोकांना जेवण देण्याचा टप्पा पार केला. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी शिवभोजन थाळी (Shivbhojan Thali) मोफत देण्याची घोषणा केली असली, तरी गेल्या वर्षभरापासून या चार संस्था कोरोनाबाधित (Covid Positive) आणि त्यांच्याशी निगडित असलेल्यांना मोफत जेवण पुरवत आहेत. (Jivdani Devi Mandir Trust and four other Vasai Virar Sanstha provide Free Meal Breakfast to over 1 crore people)

हेही वाचा: दिलासादायक! मुंबईत 6 लाख 02 हजार,383 रुग्ण कोरोनामुक्त

गेल्या वर्षी 22 मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाल्यावर विवा चॅरिटेबल ट्रस्ट, जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट, श्री साई मंदिर संस्थान आणि यंगस्टार ट्रस्ट यांच्या माध्यमातून श्रमिक, गरीब लोकांना जेवण आणि नाश्ता पुरवला जात आहे. त्याचबरोबर पालिका हद्दीतील कोविड सेंटरलाही जेवण पुरविण्यात येत आहे. यामध्ये जेवणात भात, डाळ, 2 भाज्या (ज्यात एक भाजी कडधान्याची), चपाती यांचा समावेश असून नाश्ता म्हणून पोहे, उपमा, इडली, साबुदाणा वडा असे वेगवेगळे पदार्थ देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे वेगवेगळ्या कोविड सेंटरमध्ये जेवण देणाऱ्या किंवा जेवण बनवून इतरांना देणाऱ्या येथील एकाही कर्मचाऱ्याला कोरोना झालेला नाही . आजही हे कर्मचारी सकाळपासून रात्रीपर्यंत हे कर्मचारी सतत काम करत आहेत.

(संपादन- विराज भागवत)

loading image
go to top