

Gas Shortage Affects Hospital Canteen Services
ESakal
भाग्यश्री भुवड
मुंबई : महानगरातील सरकारी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये गॅसटंचाईचे परिणाम दिसू लागले आहेत. जे. जे. रुग्णालय परिसरातील काही कॅन्टीनमध्ये मेन्यू कमी करण्यात आला असून, काही ठिकाणी गॅसअभावी स्वयंपाक पूर्णपणे बंद झाले आहे. अशा ठिकाणी सध्या केवळ पॅकबंद खाण्यापिण्याच्या वस्तू उपलब्ध आहेत. त्यामुळे वैद्यकीय विद्यार्थी, डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाइकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.