
मुंबई : जे.जे. रुग्णालयातील अंतिम वर्षाच्या निवासी डॉक्टरने बुधवारी (ता. १६) आत्महत्येचा प्रयत्न केला. २८ वर्षीय डॉक्टरने चिंता आणि झोपेच्या समस्यांवर दिल्या जाणाऱ्या गोळ्या घेतल्याचे सांगितले जात आहे. तिच्या सहकाऱ्यांनी तिला रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल केले. तत्काळ उपचारांमुळे ती आता बरी आहे. याबाबत चौकशी केली जाणार आहे.