धक्कादायक ! जे.जे मार्ग पोलीस ठाण्याच्या 59 पोलिसांना कोरोनाची बाधा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 मे 2020

जे.जे मार्ग पोलीस ठाणे हे दक्षिण मुंबइतील अत्यंत रहदारीचा परिसर आहे. चोर बाजारापासुन ते अनेक बाजार या ठिकाणी असल्याने सातत्याने वर्दळ सुरु असते. त्यातच कोरोनाचे संकट आल्यापासून येथील नागरिकांनी लाॅकडाऊनचे व्यवस्थित पालन केले नाही.

मुंबई : दक्षिण मुंबईत अत्यंत दाटीवाटीच्या ठिकाणी असलेल्या जे. जे मार्ग पोलीस ठाण्यातील 59 पोलिस कोरोना बाधित सापडले आहेत. तसेच, या ठिकाणी दाखल केलेल्या राज्य राखीव दलाचे 14 जवानदेखील पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता पोलिसांसोबतच राज्य राखीव दलाचे जवानांनाही कोरोनाची लागण होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे.

Big News - क्या बात हैं ! प्लाझ्मा थेरपी अखेर यशस्वी, नायरमधील रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा

जे.जे मार्ग पोलीस ठाणे हे दक्षिण मुंबइतील अत्यंत रहदारीचा परिसर आहे. चोर बाजारापासुन ते अनेक बाजार या ठिकाणी असल्याने सातत्याने वर्दळ सुरु असते. त्यातच कोरोनाचे संकट आल्यापासुन येथील नागरिकांनी लाॅकडाऊनचे व्यवस्थित पालन केले नाही. याचा फटका नाकांबदी आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना बसत आहे. येथे प्रथम 8 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर हा आकडा वाढत आता 59 वर पोहोचला आहे. ज्यावेळेस येथे 26 पोलिस कोरोना पॉझिटिव्ह होते, तेव्हा पोलिस आयुक्तांनी स्वतः याठिकाणी भेट देत पोलिसाचे मनोबल वाढवित काळजी घेण्याचे आवाहन केले होते.

महत्वाची बातमी : सारखा मास्क लावल्याने आपणच उत्सर्जित केलेला कार्बन डायऑक्सिइड घेतला जातो आणि होतोय हायपोक्सिया?

त्यानंतर या ठिकाणी राज्य राखीव दलाचे जवान तैनात केले होते; मात्र हे जवानदेखील कोरोना संक्रमणात अडकले असून 14 जणांना त्याची लागण झाली आहे. दरम्यान, सहार पोलीस ठाण्यातील पोलिसांना देखील कोरोना होण्याची आकडेवारी वाढत असल्याचे समोर आले आहे.

JJ Marg Police Station 59 Corona positive police, 14 State Reserve Force personnel positive


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JJ Marg Police Station 59 Corona positive police, 14 State Reserve Force personnel positive