सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासास अद्यापही 'रेड सिग्नल'; पालिका आयु्क्तांचे 'वेट अँड वॉच'

तुषार सोनवणे
Tuesday, 24 November 2020

सर्वसामान्यांसाठी मुंबईची लोकल ट्रेन कधी सुरू होणार याबाबत अद्यापही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. याबाबत मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी महत्वाची प्रतिक्रीया दिली आहे.

मुंबई - दिवाळीनंतर मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने तज्ज्ञांकडून दूसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी मुंबईची लोकल ट्रेन कधी सुरू होणार याबाबत अद्यापही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. याबाबत मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी महत्वाची प्रतिक्रीया दिली आहे.

हेही वाचा - आजोबांचा नेम चुकला अन् नातवाला लागली गोळी; महाडमधील विचित्र घटना

मुंबईतील सर्वसामान्य चाकरमान्यांसाठी लोकल ट्रेन कधी सुरू होणार याबाबत संभ्रम असताना बीएमसी आयुक्तांनी महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. ' मुंबईमध्ये दिवाळी नंतर कोरोनाचे आकडे वाढतील असे तज्ज्ञांचे म्हणणे होते. लोकं एकमेकांच्या संपर्कात मोठ्या प्रमाणावर येत होते. त्यामुळे येते तीन आठवडे मुंबईसाठी खुप महत्वाचे आहेत. या दिवसांमध्ये कोरोनाचे आकडे वाढू नये आणि पुन्हा स्थिती हाताबाहेर जाऊ नये याकडे आपण बारीक लक्ष ठेऊन आहोत. मुंबईतील सध्याच्या कोरोना आकडेवारी जर 15 दिवस स्थिर राहिली तर निश्चितपणे लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत विचार कऱण्यात येईल', असे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात यायचं असेल तर दाखवावा लागणार कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल

त्यामुळे चातकासारखी मुंबईच्या लोकल ट्रेन प्रवासाची वाट पाहणाऱ्या सर्वसामान्यांना लगेचच दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता येत्या दिवसात कोरोनाची संसर्ग स्थिर राहिला तर नक्कीच सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकेल अशी आशा आहे.

The journey of the common Mumbai local train is still a red signal Wait and watch of the Municipal Commissioner


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The journey of the common Mumbai local train is still a red signal Wait and watch of the Municipal Commissioner