मुंबई - विशेष सत्र न्यायालय बहुचर्चित मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल गुरुवारी (ता. ८) जाहीर करण्याची शक्यता आहे. पहिले आरोपपत्र दाखल झाल्यानंतर तब्बल १५ वर्षे या खटल्याची सुनावणी सुरू होती. आधी दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), नंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) तपास करून सादर केलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायालय आरोपींना दोषी ठरवते की निर्दोष, याबाबत उत्सुकता आहे.