Juhu Beach : जुहू बीच परिसर होणार प्लास्टिक फ्री

अंधेरी के पश्चिम विभागाअंतर्गत जुहू बीचच्य़ा ठिकाणी सुशोभिकरणासाठी पालिकेकडून पुढाकार घेण्यात आला आहे.
Juhu Beach
Juhu BeachSakal
Summary

अंधेरी के पश्चिम विभागाअंतर्गत जुहू बीचच्य़ा ठिकाणी सुशोभिकरणासाठी पालिकेकडून पुढाकार घेण्यात आला आहे.

मुंबई - अंधेरी के पश्चिम विभागाअंतर्गत जुहू बीचच्य़ा ठिकाणी सुशोभिकरणासाठी पालिकेकडून पुढाकार घेण्यात आला आहे. प्लास्टिक फ्री समुद्र संकल्पना या जुहू बीच परिसरात अंमलात आणली जाणार आहे. प्लास्टिक समुद्रात खुलेपणे टाकण्यापासून रोखण्यासाठी आणि प्रदुषण कमी करण्यासाठी ही संकल्पना राबविण्याचा पालिकेचा मानस आहे. निसर्गाच्या संवर्धनाच्या अनुषंगाने आणि प्लास्टिक वापरात घट करण्याचे उदिष्ट या संकल्पनेअंतर्गत ठेवण्यात आले आहे.

बीचच्या किनाऱ्यावरच कचरा गोळा करण्यासाठी महाकाय अशा माशाच्या आकाराची जाळीदार कचरापेटी तयार करण्यात आली आहे. नैसर्गिक गोष्टींचा वापर करत प्लास्टिकचा वापर आणि अवलंबता कमी करणे हे त्यामागील उदिष्ट आहे. निसर्गाचे सौंदर्य नैसर्गिक गोष्टीने वाढवा, हाच या माशाच्या संकल्पनेमागील उद्देश आहे.

जुहू बीचच्या प्रवेशालाच विविध स्वरूपाचे दरवाजे लावण्यात येणार आहेत. त्याठिकाणी लाईट्सचा वापर करून हे प्रवेशाचे दरवाजे लावण्यात येतील. तसेच मुलांच्या मनोरंजानासाठी पोल आर्टचीही स्थापना करण्यात येणार आहे. तसेच व्यायामासाठीही पोलचा वापर करण्यात येईल. या पोललाही रोषणाई करण्याचा पालिकेचा मानस आहे. सावल्यांचा वापर करून मेटल्सचे अल्फाबेट्सही याठिकाणी वापरण्यात येणार आहेत. तर प्रवेशद्वाराला लावण्यात येणाऱ्या पीलरच्या ठिकाणी वेली सोडण्यात येणार आहेत.

जुहू बीचच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या रोषणाईमध्ये जुहू बीच परिसरात प्रवेशद्वाराच्या कमानी, झाडांच्या खालील आसन व्यवस्था, चालण्यासाठीच्या जागा, भिंतींवरील ग्राफिटी, मुलांसाठीचे मनोरंजन, बीचवरील आसन व्यवस्था, सार्वजनिक शौचालये यासरख्या गोष्टींवर काम करण्यात येणार आहे.

भारतातील दरवाजांची संकल्पना

जुहू बीच परिसरात प्रवेशालाच भारतात विविध पद्धतीच्या आढळणाऱ्या दरवाजांची संकल्पना अंमलात येणार आहे. त्यामध्ये देशभरात विविध ठिकाणी आढळणाऱ्या दरवाजांचा समावेश याठिकाणी असेल. त्याअनुषंगाने भारतातील विविध दरवाजांची निवड यानिमित्ताने करण्यात आली आहे.

बीच परिसरातील रोषणाईसाठीही पुढाकार घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने होलोग्राम या हलक्या पोलचा वापर याठिकाणी करण्या येईल. पथदिव्यांच्या स्वरूपात या आकर्षक अशा दिव्यांचा समावेश असेल. लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी काही स्ट्रीट एंटरटेनमेंटच्या खेळण्याचा वापर तसेच ओपन जीमसारख्या संकल्पनाही या परिसरात राबविण्यात येतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com