

मुंबई : जुहू समुद्रकिनाऱ्यावर (juju beach) सुमारे 5 ते 8 किलोमीटरपर्यंतच्या किनाऱ्यावर तेल वाहून (oil) आले आहे. यामुळे समुद्र किनाऱ्यावरील सुमारे 3 किलोमीटरची वाळू काळी (black sand) झाली आहे. हे तेल समुद्रात कसे आले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्यात तेल मिसळणे(oil mix in water) हे समुद्रातील जीवजंतू आणि माशांसाठी खूप हानिकारक (impact on fish) ठरू शकते.
गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या लोकांनी अनेक किलोमीटर दूर समुद्राच्या किनाऱ्यावर काळ्या रेषा उमटलेल्या पाहिल्या. त्यातील काही लोकांनी फोन करून स्थानिक पोलीस स्टेशन आणि पालिका प्रशासनाला कळवले.माहिती मिळताच पालिकेचे कर्मचारी तेल गळतीची चौकशी करण्यासाठी समुद्रकिनारी पोहोचले. त्यानंतर त्यांनी लगेचच समुद्र किनाऱ्याची साफसफाईचे काम सुरू केले.
समुद्रकिनाऱ्यावरील वाहून आलेल्या तेलाची कारणे शोधण्यासाठी प्रभाग अधिकारी नेमला जाईल असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.प्रशासन समुद्रकिनाऱ्यावरील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जुहू समुद्रकिनाऱ्यावर तेलाची तपासणी करण्यासाठी एक प्रभाग अधिकारी नेमला जाईल. हे कसे घडले, याची कारणे आम्हाला अजून कळू शकली नाहीत, पण त्यामागची कारणे शोधली जातील असे ही त्या पुढे म्हणाल्या.
2016 मध्ये देखील अशाप्रकारची तेल गळती झाली होती. जुहू बीच हे पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण आहे.परंतु समुद्र बराच आत आला असून तेल गळती सारख्या घटना देखील वाढल्या आहेत.त्यामुळे समुद्रकिनारा वारंवार प्रदूषित होत आहे. जर आपण प्रयत्न केला तर ते स्वच्छ केले जाऊ शकते. पण त्यासाठी वेळ आणि प्रयत्न करावा लागेल असे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. आम्ही लगेचच हे काळे तवंग साफ केले. जुहू समुद्रकिनारी नियुक्त कंत्राटदाराला हे तवंग लवकरात लवकर काढण्याचे निर्देश देण्यात आले.आतापर्यंत जवळपास सहा मेट्रिक टन वाळू आणि कचरा साफ करण्यात आला आहे असे के वेस्ट वॉर्डचे सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
यापूर्वी देखील आम्ही अशा प्रकारचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. पण त्यावरून काहीही निष्कर्ष काढता आला नाही. खोल समुद्रात मालवाहू जहाजातून तेल गळती झाली असण्याची शक्यता आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करू असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संयुक्त संचालक वाय बी सोनटक्के यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.