esakal | मुंबईतल्या कोरोना संशयित रुग्णांसाठी पालिकेचा मोठा निर्णय

बोलून बातमी शोधा

मुंबईतल्या कोरोना संशयित रुग्णांसाठी पालिकेचा मोठा निर्णय

सर्व बेड्सचे व्यवस्थापन आणि नियोजन वॉर्ड रुम मार्फतच करण्याचे निर्देश पुन्हा एकदा देण्यात आले आहे.

मुंबईतल्या कोरोना संशयित रुग्णांसाठी पालिकेचा मोठा निर्णय
sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई: जंम्बो कोविड केंद्रात आता चाचणी झाल्यानंतर अहवालाच्या प्रतिक्षेत असलेल्या संशयित रुग्णांसाठीही बेड्स राखून ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आता जंम्बो कोविड केंद्र आणि प्रभागात बेड्स व्यवस्थापनासाठी समन्वय ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्त करण्याचे आदेश महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्याच बरोबर सर्व बेड्सचे व्यवस्थापन आणि नियोजन वॉर्ड रुम मार्फतच करण्याचे निर्देश पुन्हा एकदा देण्यात आले आहे.

कोविडच्या चाचण्या वाढत आहे याच काळात रुग्ण वाढत आहे. चाचण्या वाढल्याने काही वेळा अहवाल येण्यासही विलंब होत आहे. महापालिका आयुक्तांनी 24 तासात अहवाल देण्याचे आदेश सर्व प्रयोग शाळांना दिले आहेत. मात्र रात्री चाचणी झाल्यास अहवाल येण्यास विलंब होतो. त्यामुळे लक्षणं असलेल्या अशा संशयित रुग्णांना घरी न ठेवता त्यांना कोविड केंद्रांमध्ये दाखल करुन घ्यावे असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

आयुक्तांनी रविवारी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि टास्क फोर्सच्या तज्ज्ञांची बैठक घेतली. या बैठकीत बेड्सच्या व्यवस्थापनावर चर्चा करण्यात आली. महानगर पालिकेचे सात जंम्बो कोविड केंद्र आहेत. या सातही केंद्रात दोन पाळ्यांमध्ये नोडल ऑफिसर नियुक्त करावेत तसेच प्रभागाच्या वॉर्ड रुममध्येही दोन पाळ्यांमध्ये नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात यावी. हे नोडल ॲाफिसर एकमेकांच्या संपर्कात राहतील असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

 असे होणार नियोजन

बाधिताची प्रभागातील वॉर रुमला माहिती मिळताच नोडल ऑफिसर संबंधित जंम्बो कोविड केंद्रातील नोडल ऑफिसरला संपर्क साधून बेड्ची व्यवस्था करायाला सांगेल.
संध्याकाळी 7 वाजल्यानंतर संशयिताचा अहवाल प्रतिक्षेत असेल तर अहवालची प्रतिक्षा न करता जंम्बो कोविड केंद्रात संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र सोय करण्यात येणार आहे. अहवाल येईपर्यंत संशयित बाधित त्या ठिकाणी दाखल करुन घेण्यात येणार आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

अहवालाच्या प्रतिक्षेत वेळ न घालवता संशयित रुग्णाना जंम्बो कोविड केंद्रात दाखल करुन घेण्यासाठी बेड्स उपलब्ध करुन देण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहे. त्यामुळे लक्षणं असलेल्या रुग्णांवर तत्काळ उपचार सुरु करण्यात येणार आहे. गरजेनुसार ऑक्सिजन तसेच इतर व्यवस्थाही करण्यात येणार आहे. तत्काळ उपचार मिळाल्यास आजार वळवण्याचा धोका कमी होऊ मृत्यूदरही अधिक आटोक्यात आणण्यास मदत होईल. 
इक्बाल सिंह चहल ,आयुक्त मुंबई महानगर पालिका

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Jumbo Covid Center space for suspected patients bmc decision