Jumbo Covid Centre : जम्बो कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी ईडीचीछापेमारी; कंत्राटदारांची नावे उघड

ज्या कंत्राटदारांवर ईडीने छापे टाकले त्यात घाटकोपर येथील रोमीन छेडा या कंत्राटदाराचा समावेश आहे,
कोविड सेंटर
कोविड सेंटरsakal

Jumbo Covid Centre - ईडीने बुधवारी जम्बो कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी मुंबई परिसरात बुधवारी छापेमारी केली. या छापेमारीत सरकारी कंत्राटदारांची नावे समोर आली आहेत. रोमीन छेडा, रोमेल ग्रुपचे बिल्डर ज्यूड रोमेल आणि डॉमनिक रोमेल अशी कंत्राटदारांची नावे आहेत.

ज्या कंत्राटदारांवर ईडीने छापे टाकले त्यात घाटकोपर येथील रोमीन छेडा या कंत्राटदाराचा समावेश आहे, ज्यांना ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे कंत्राट देण्यात आले होते. छेडा यांना उत्तर प्रदेशस्थित हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत कंत्राटाचे काम करून घेतल्याचा संशय आहे. कोविड काळात ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी त्यांना सुमारे ३०० कोटी रुपये दिले गेल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.

कोविड सेंटर
Mumbai : मुंबईत भाजपाचे वाढले बळ! ठाकरेंच्या शिवसेनेसमोर खडतर आव्हान

निकृष्ट उपकरणे पुरवल्याचा आरोप असूनही, त्याचा तपास सुरू असताना कंत्राटदाराच्या फायलींवर मनपा अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली आणि त्याला भरघोस मोबदला दिला गेला, असेही सूत्रांनी सांगितले. छेडा हा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचा अधिकृत प्रतिनिधी आहे. दुसरा प्रमुख कंत्राटदार राहुल गोम्स याची ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रा. लिमिटेड ही कंपनी आहे,

त्याने दहिसर, वरळी, एमएमआरडीए आणि मुलुंड आणि बीकेसी येथील कोविड सेंटर रुग्णालयामध्ये बेड, पंखे, तंबू आणि इतर सुविधा पुरवल्या आहेत. ओक्स मॅनेजमेंट कंपनीला मुंबई मनपाने सुमारे ४० कोटी रुपये दिले होते.

कोविड सेंटर
Mumbai Metro : मागाठाणे मेट्रो स्थानकाबाहेर भराव टाकण्याचे काम सुरू; बंद मार्ग लवकर सुरु करण्याचा प्रयत्न

आता त्याची बारकाईने तपासणी केली जात आहे. विलेपार्लेस्थित रोमेल ग्रुपचे डेव्हलपर ज्युड रोमेल आणि डॉमिनिक रोमेल यांना जम्बो सेंटर युनेस्को गोरेगावसह मेक शिफ्ट रुग्णालये उभारण्यासाठी त्यांच्या संस्थेला १३ कोटी रुपये मिळाले होते. ईडीने त्यांच्या घरातून ६० लाखांची रोकड जप्त केली आहे. रोमेल बंधूंचे आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांच्याशी संबंध असल्याचा संशय ईडीकडून व्यक्त करण्यात आला होता.

कोविड सेंटर
Mumbai News : मुंबईत निवासी जागांच्या किमतीत वाढ! दोन वर्षांत १४ टक्क्यांनी वाढ

साठ लाखांची रक्कम जप्त

मुंबई मनपाच्या कोविड जम्बो सेंटर घोटाळ्यातील मनीलाँडरिंग प्रकरणाशी संबंधित चौकशीचा भाग म्हणून या कंत्राटदारांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीकडून बुधवारी छापेमारी करण्यात आली.

छापे टाकण्यात आलेली ठिकाणे ही कोविडच्या कालावधीत मुंबई महापालिकेला सेवा पुरविणाऱ्या कंत्राटदारांच्या संबंधित असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली. छापेमारीदरम्यान आरोप असलेल्या कंत्राटदारांकडून सुमारे साठ लाखांची रोख रक्कम आणि काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com