धावत्या रेल्वेत जुंपली; जिगरबाज प्रवाशामुळे चोरट्यांचा बेत फसला

धावत्या रेल्वेत जुंपली
धावत्या रेल्वेत जुंपली

मुंबई ः धावत्या रेल्वेमध्ये प्रवासी आणि तिघा चोरट्यांमध्ये जोरदार जुंपली. मात्र, प्रवाशाने केलेल्या जोरदार प्रतिकारामुळे चोरटेही हतबल झाले. स्थानकावर रेल्वे थांबताच चोरट्यांनी प्रवाशाचा किमती ऐवज खेचून जीवाच्या अाकांताने रेल्वेतून उडी ठोकून पळ काढला. मात्र, प्रवाशाच्या तीक्ष्ण नजरेने लोकल सुरू होताच त्यातील एका चोरट्याला हेरले आणि त्याचा पाठलाग करून गाठले. दोघे पळाले. मात्र, त्यातील एक जण सापडला.

खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपला पडणार खिंडार, जयंत पाटलांनी केला गौप्यस्फोट
  
रेल्वे प्रवासी संतोष साळवे यांनी सीएसटीएम स्थानकावरून बुधवारी पनवेल लोकल पकडली. लोकल मशीद रेल्वेस्थानकावर थांबली. त्यांच्या डब्यात तीन अनोळखी व्यक्ती चढल्या. त्यानंतर सँडहर्स्ट रोड रेल्वेस्थानक येथे पुन्हा लोकल थांबली. त्यानंतर त्या अनोळखी तिघांची साळवे यांच्याशी झटापट झाली. मात्र, या सर्व परिस्थितीत साळवे यांचा मोबाईल, पाकीट आणि वस्तू घेऊन त्या तिघा चोरट्यांनी धूम ठोकली.

तिघांनी साळवेंच्या खिशातील मोबाईल, पाकीट व इतर वस्तू असा 7 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. मुद्देमालासह तिघांनीही डॉकयार्ड रोड रेल्वेस्थानकाच्या विरुद्ध बाजूस ट्रॅकमध्ये उतरून पोबारा केला. मात्र, लोकल गेल्यानंतर त्यापैकी एक जण फलाटावर दिसल्याने साळवे यांनी त्यास पकडून ठेवले. वडाळा रेल्वे पोिलस ठाण्यातील कॉन्स्टेबल संदीप मिठे डॉकयार्ड रोड रेल्वेस्थानकात रात्रपाळीस आपले कर्तव्य बजावत असताना फलाट क्रमांक एकवर आरडाओरडा करत एका रेल्वे प्रवाशाने एका व्यक्तीस पकडून ठेवल्याचे आढळून आले.

मिठे यांनी याबाबत अधिक चौकशी केली असता हा चोर असून, त्याचे दोन साथीदार पळून गेल्याचे सांगितले. त्यानंतर पकडलेल्या आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या उर्वरित दोन्ही साथीदारांबाबत माहिती दिली असता पोलिसांनी त्या दोघांना चार तासांत अटक केले. गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती वडाळा रेल्वेचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पाल यांनी दिली.

(संपादन- बापू सावंत)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com