खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपला पडणार खिंडार? जयंत पाटीलांनी केला गौप्यस्फोट

तुषार सोनवणे
Wednesday, 21 October 2020

एकनाथ खडसे यांच्या सोबत काही भाजपतील नाराज आमदार आणि पदाधिकाराही राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

मुंबई - माजी महसूलमंत्री आणि खानदेशातील मातब्बर नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. परंतु एकनाथ खडसे यांच्या सोबत काही भाजपतील नाराज आमदार आणि पदाधिकाराही राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

सगळ्यांसाठी लोकल ट्रेन कधी सुरू होणार? मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले उत्तर

राज्यातील राजकारणात आज मोठी घडामोड पाहण्यात आली. भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गेली 4 वर्षे आपल्यावर पक्षात अन्याय झाला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर अन्याय तसेच बदनामी करण्यात आल्याचा आऱोप खडसेंनी केला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाला दूजोरा दिला आहे. यावेळी पत्रकारांनी पाटील यांना विचारले की, खडसे यांच्यासोबत आणखी कोणते नेते किंवा आमदार प्रवेश करणार का? यावर पाटील यांनी गौप्यस्फोट केला की, ''भाजपमधील काही आमदार आणि पदाधिकारीही राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत. परंतु कोरोना काळात पोटनिवडणूका लागू नयेत म्हणून ते काही काळानंतर येतील''.

नाथाभाऊंच्या सोडचिठ्ठीनंतर मुंबई भाजपचा बडा नेता पक्ष सोडणार ?

भाजपमध्ये समाधानी नसलेले व अन्याय झाला अशी भावना असलेले, इतर आमदार देखील कालांतराने पक्षांतर करतील. खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा भाजपतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

--------------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jayant pati announces bjp mla to join ncp