भिवंडीतील निर्भयाला महिन्याभरात मिळाला न्याय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

प्रकरणाची लवकरच होणार सुनावणी

ठाणे : महिनाभरापूर्वी भिवंडीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या नराधमाविरोधात ठाणे जिल्हा न्यायालयाच्या विशेष पोस्को न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते.

हेही वाचा - पोलिसांना बिर्याणी पडली महाग

या खटल्याची जलदगती सुनावणी आता २४ जानेवारीपासून होणार आहे, अशी माहिती सरकारी वकील संजय मोरे यांनी दिली. एक महिन्यात सुनावणी सुरू होणारी संपूर्ण राज्यातील ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.

भिवंडीतील भोईवाडा पोलिस ठाणे क्षेत्रात २२ डिसेंबर २०१९ रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. भरतकुमार धनीराम कोरी (३०) या नराधमाने सात वर्षीय मुलीला आईस्क्रीमचे प्रलोभन दाखवून अपहरण केले होते. त्यानंतर पीडित मुलीवर पाशवी अत्याचार करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने तिची दगडाने हत्या करण्यात आली होती.

हेही वाचा - खोट्या नोटा शोधण्याच्या बहाण्याने खातेदाराला गंडा

याप्रकरणी जलद तपास करून, पोलिसांनी १५ दिवसांतच ६ जानेवारी रोजी आरोपीवर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. पोस्को न्यायालयाचे विशेष न्यायाधीश के. डी. शिरभाते यांच्या न्यायालयात नराधम कोरी याच्यावर आरोप निश्‍चित केला गेला आहे. तसेच या प्रकरणाची सुनावणी २४ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

web title : Justice for bhiwandis Nirbhaya 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Justice for bhiwandis Nirbhaya