

Kailas Shinde written letter to Eknath Shinde
ESakal
डोंबिवली : कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघा एक दिवस उरला असताना सर्वच पक्षांतील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. उमेदवारी जाहीर करताना बंडखोरी होऊ नये म्हणून अनेक पक्षांनी अद्याप नावांवर शिक्कामोर्तब केलेले नाही. अशा वातावरणात शिंदे गटाच्या होमग्राऊंडवरच नाराजी उफाळून आल्याचे चित्र दिसून आले आहे. माजी सभागृह नेते आणि गटनेते कैलास शिंदे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेले पत्र सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.