पतीच्या आत्महत्येच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू; कळंबोलीतील घटना | Panvel crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sucide

पतीच्या आत्महत्येच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू; कळंबोलीतील घटना

पनवेल : आर्थिक संकटात (Financial crisis) सापडल्याने एकाने स्वतःला संपविल्याचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या पत्नीचाही मृत्यू (Wife death) झाल्याची घटना कळंबोली वसाहतीत (kalamboli society) घडली. संदीप कुलपे (sandip kulpe death) (वय ४५) असे मृताचे नाव आहे. रोडपाली परिसरातील सिडकोच्या गृहसंकुलातील (cidco apartment) सदनिकेत ते भाड्याने राहत होते. संदीप ‘स्विगी’ कंपनीत काम करीत होते. त्यांची पत्नी साक्षी (४०) शिकवणी वर्ग चालवत होत्या.

हेही वाचा: गोदरेज अॅग्रोव्हेटचे उत्पन्न वाढले

कुलपे दाम्पत्याची मोठी मुलगी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे; तर लहान मुलगी शालेय शिक्षण घेत आहे. कोरोना काळात कुलपे दाम्पत्य आर्थिक संकटात सापडले होते. त्यामुळे गेले काही दिवस मानसिक तणावाखाली वावरत होते. त्यात काही दिवसांपासून कुलपे यांची पत्नी साक्षी आजारी पडल्याने स्थिती अधिकच नाजूक झाली होती. या साऱ्याचा परिणाम म्हणून कुलपे यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा नातेवाईकांमध्ये होती. विशाल यांच्यावर मानसिक ताण असल्याचे जाणवत होते. ते काही दिवसांपासून समाजमाध्यमावर आत्महत्या करण्याच्या सोप्या प्रकारांचा शोध घेत होते, तसेच मित्र आणि मुलींकडेही आत्महत्येचे विचार बोलून दाखवल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

एसएमएस पाठवून मुलीची माफी

संदीप हे रविवारी (ता.७) मुंबई येथे काही कामानिमित्त गेले होते. रात्री मुंबईतच वास्तव्य करून दुसऱ्या दिवशी घरी परतताना दुपारी ११ च्या सुमारास मोठ्या मुलीच्या मोबाईलवर त्यांनी बेलापूरला पोहोचल्याचा ‘एसएमएस’ केला. त्यानंतर कुलपे यांनी दुपारी दीडच्या सुमारास ‘मला माफ कर’ असा एसएमएस मुलीच्या मोबाईलवर पाठवला. घरच्यांनी पोलिसांच्या मदतीने मोबाईल लोकेशनच्या साह्याने शोध घेतला असता खारघर वसाहतीतील गुरुद्वारासमोरील मैदानात कुलपे यांचा मृतदेह नातेवाईकांना आढळून आला.

याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मंगळवारी दुपारी संदीप यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच वेळी अस्वस्थ वाटू लागल्याने विशाल यांच्या पत्नीला नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने हृदयविकाराचा झटका येऊन पत्नी साक्षी हिचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: Kalamboli Society Sandip Kulpe Death Wife Death Cidco Apartment Panvel Crime Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :panvelcrime update