Venomous Indian Cobra found inside Kalyan ACP office
esakal
Indian Cobra Enters Kalyan ACP Office : कल्याणमध्ये काल (शुक्रवारी) दुपारी एक धक्कादायक घटना घडली. Indian cobra या अतिविषारी सापाने थेट कल्याण येथील एसीपी कार्यालयात प्रवेश केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुमारे साडेपाच फूट लांबीच्या या नागामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.