

More than 250 candidates and parents protest outside an exam centre in Kalyan following technical and administrative issues during the Bombay High Court clerk typing test.
Sakal
कल्याण : कल्याण मधील एपीएमसी मार्केट परिसरातील परीक्षा केंद्रावर घेतलेल्या हायकोर्टाच्या लिपिक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत या केंद्राच्या अनागोंदी कारभारचा फटका परिक्षार्थी उमेदवारांना बसल्याने २५०हून अधिक परिक्षार्थीसह पालकांनी रविवारी संतप्त होत ठिय्या मांडला. अखेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवित परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे परिक्षा केंद्राच्या ढिसाळ कारभाराचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.