Kalyan News : कल्याण बाजारपेठ परिसरात रेड्याचा धुमाकूळ...

कल्याण पश्चिमेतील पार नाका परिसरात एका पिसाळलेल्या रेड्याने दहशत माजवली.
kalyan area durgadi fort wild bull-buffalo injured hitting the citizens fire brigade police
kalyan area durgadi fort wild bull-buffalo injured hitting the citizens fire brigade policesakal

Kalyan News : कल्याण पश्चिमेतील पार नाका परिसरात एका पिसाळलेल्या रेड्याने दहशत माजवली. दुर्गाडी चौकाकडून सुसाट वेगाने धावत सुटलेल्या हा वळू रस्त्यात दिसणाऱ्या फोरव्हीलर-दुचाकी आणि नागरिकांना धडक देत बैल बाजार परिसरातील एका सोसायटीच्या आवारात घुसला, यामुळे नागरिकांची पळापळ झाली.

प्रचंड गोंधळ झाल्यानंतर काही नागरिकांनी त्याला सोसायटीच्या आवारात बंद करत याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मदतीला बोलावत सुमारे तीन तासानंतर या रेड्याला एका विजेच्या खांबाला बांधून ठेवले. हा रेडा प्रचंड जखमी झाला होता त्याच्या तोंडातून डोक्यातून रक्त वाहत होते.

kalyan area durgadi fort wild bull-buffalo injured hitting the citizens fire brigade police
Shrikant Eknath Shinde यांचा अधिकाऱ्यांवर भडका उडाला | Kalyan Shilfata Road | Loksabha

मात्र, त्याला आटोक्यात आणले तरी पुढे काय करायचे या प्रश्नाचे उत्तर सापडत नव्हते. पोलिसांनी वारंवार महापालिकेकडे मदत मागितल्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रभाग क्षेत्र अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत दाखल झाले.

त्यांनी त्याला एका टेम्पोतून दुर्गाडी जवळील मोकळ्या जागी नेले. मात्र, त्याच्यावर उपचार करण्यासाठी प्राण्यांचे डॉक्टर देखील उपस्थित नसल्याने सुमारे तासभर डॉक्टरांचा शोध सुरू होता, दरम्यान त्याच्यावर उपचार करून त्याला एखाद्या कोंडवाड्यात किंवा गोशाळेत धाडले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com