esakal | सराईत गुन्हेगाराला खाकीचा दणका; रामनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
sakal

बोलून बातमी शोधा

Thief arrested

सराईत गुन्हेगाराला खाकीचा दणका; रामनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : दुकानांची, घरांची रेकी करून रात्रीच्या वेळेस दुकानांच्या शटरचे टाळे तोडून तो मुद्देमाल (robbery) घेऊन पसार होत असे. चोरी करताना पाठीमागे तो कोणताही पुरावा सोडत नसल्याने (no evidence) त्याला पकडणे हे पोलिसांसमोर एक आव्हान होते. मात्र तिसऱ्या नजरेने त्याला हेरलेच आणि मुंबईतील तडीपार सराईत चोरटा (Thief arrested) रामनगर पोलिसांच्या (Ram nagar Police) जाळ्यात अडकला. सूरज चव्हाण (वय 30) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्यावर एकूण 16 गुन्हे दाखल (Crime cases) आहेत. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने (kalyan court) आरोपीस शनिवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून अधिक तपास सूरु असल्याचे डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे (jayram more) यांनी सांगितले.

हेही वाचा: राज्याची 500 कोटींची एसटीला मदत; कर्मचाऱ्यांना मिळणार जुलै महिन्याचे वेतन

डोंबिवली पूर्वेतील आगरकर रोडवरील महावीर मोबाईल शॉप मध्ये 28 ऑगस्टला चोरी झाली होती. चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून दुकानातील 7 मोबाईल व 5 हजाराची रोख रक्कम असा एकूण 97 हजार 569 किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला. गुन्हेगार हा सराईत चोर असल्याने तो घटनास्थळी कोणताही संशयास्पद पुरावा सोडत नव्हता. मात्र तिसऱ्या नजरेतून त्याची सुटका झाली नाही.

सीसीटीव्ही मध्ये त्याची चोरी कैद झाली व त्याच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक दीपक दाभाडे, पोलीस हवालदार शंकर निवळे, विशाल वाघ, निलेश पाटील यांच्या पथकाने शोध सुरू केला. 31 ऑगस्टला 90 फिट रोडला एक व्यक्ती संशयास्पद आढळून आला असता त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ 2 मोबाईल मिळून आले. हे मोबाईल डोंबिवलीत दाखल गुन्ह्यातील असल्याची खात्री पटताच त्याला अटक करण्यात आली. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर केले असता त्याला 4 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस कोठडीत तपास केला असता डोंबिवलीतील खोणी गावात राहणार सूरज हा मुंबतील घरफोडीच्या गुन्ह्यातील तडीपार चोर आहे. मुंबई, ठाणे, डोंबिवली येथील पोलीस ठाण्यात 16 गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून मोबाईल, चांदीची भांडी व एल.ए. डी. टीव्ही असा एकूण 1 लाख 7 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मोरे यांनी दिली.

loading image
go to top