Kalyan: आरोपी विशाल गवळी व साक्षी गवळी यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ

Maharashtra Crime: कल्याण पूर्वेत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपी विशाल गवळी याला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.
Kalyan crime Accused Vishal Gawli and Sakshi Gawli's police custody extended by two days
Kalyan crime Accused Vishal Gawli and Sakshi Gawli's police custody extended by two dayssakal
Updated on

कल्याण पूर्वेतील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी अटक आरोपी विशाल गवळी व त्याची पत्नी साक्षी गवळी यांची गुरुवारी आठ दिवसांची कोठडी संपल्याने त्यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले होते.

काही महत्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

कल्याण पूर्वेत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपी विशाल गवळी याला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

Kalyan crime Accused Vishal Gawli and Sakshi Gawli's police custody extended by two days
Kalyan: कल्याण डोंबिवलीत १८ तासांसाठी पाणी पुरवठा बंद
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com