
कल्याणमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला बेदम मारहाण करणाऱ्या परप्रांतीय गोकुळ झा याला पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीला मारहाण केल्यानंतर त्याने ओळख लपविण्यासाठी आपला लूक बदलल्याचे समोर आले पण मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला एका शेतातून पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान गोकुळ झा याची आता गुन्हेगारीची कुंडलीच समोर आली आहे. तो सराईत गुन्हेगार आहे, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती मिळतेय.