Kalyan Crime: ठाकुर्लीचा कथित बादशहा अग्नीशस्त्रांसह अटक

महागडी बेंझ कारही ; खंडणी विरोधी पथकाने केली हस्तगत
Kalyan Crime: ठाकुर्लीचा कथित बादशहा अग्नीशस्त्रांसह अटक

Kalyan Dombivli News : मानपाडा पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसुन रील बनवत ते व्हायरल करणारा, अग्निशस्त्र जवळ बाळगत त्यांचे रील बनवत लाखो दिलो पे राज करणाऱ्या ठाकुर्लीच्या कथित बादशहाला ठाणे खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

Kalyan Crime: ठाकुर्लीचा कथित बादशहा अग्नीशस्त्रांसह अटक
Navi Mumbai Crime: ईलेक्ट्रीशियनचा मोबाईल नंबर दिला नाही म्हणून तरुणाने काढली चक्क तलवार

सुरेंद्र पाटील (वय 50) असे या कथित बादशहाचे नाव असून पोलिसांनी खंबाळपाडा येथील टाटा नाका परिसरात सापळा रचून पाटीलला अटक केली आहे. त्याच्याकडून मॅग्झीनसह 1 गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल, 1 एक गावठी कट्टा, 7 जिवंत काडतुसे यांसह मर्सिडीज बेंझ कार पोलिसांनी जप्त केली आहे.

ठाकुर्ली येथे राहणार सुरेंद्र पाटील उर्फ चौधरी याच्या विरोधात पोलीस ठाण्यात आतापर्यंत 8 गुन्हे दाखल असून त्याला तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. मात्र त्यानंतर ही सुरेंद्र हा ठाकुर्ली शहरात छुप्या पद्धतीने वावरत होता. खासगी बतमीदारांकडून ठाणे खंडणी विरोधी पथकाला सुरेंद्रचा ठावठिकाणा समजला होता.

Kalyan Crime: ठाकुर्लीचा कथित बादशहा अग्नीशस्त्रांसह अटक
Mumbai Crime: अमली पदार्थांच्या सेवनासाठी करत होते मुलांची तस्करी; पोलिसांनी केली अटक

त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.के.गोरे आणि त्यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी ठाकुर्लीतील खंबाळपाडा येथील टाटा नाका परिसरात सापळा रचला. यात सुरेंद्र अडकला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. अंगझडती दरम्यान त्याच्याकडे मॅग्झीनसह 1 गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल, 1 एक गावठी कट्टा, 7 जिवंत काडतुसे सापडली. या कारवाईत मर्सिडीज बेंझ कार देखिल जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुरेंद्र पाटील याच्या विरूध्द मानपाडा पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याचे कलम 3, 25 (1 ब), (अ) सह महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कायदा कलम 37 (1), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण आहे नक्की सुरेंद्र पाटील

ठाकुर्लीत राहणारा सुरेंद्र पाटील उर्फ चौधरी हा बांधकाम व्यावसायिक आहे. यापूर्वी त्याने एका मालिकेत देखील काम केले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविणे याचे सुरेंद्रला वेड आहे.

Kalyan Crime: ठाकुर्लीचा कथित बादशहा अग्नीशस्त्रांसह अटक
Mumbai News : 'एकता नगरमध्ये २-३ आतंकवादी आलेत...'; पोलीसांनी कंट्रोल रुमला फोन करणाऱ्याला घेतलं ताब्यात

झटपट श्रीमंत होण्यासाठी काही भोंदू बाबांनी सुरेंद्रला पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत 50 लाखाला गंडा घातला होता. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

मानपाडा पोलिसांनी या भोंदू बाबांना पकडून त्यांच्याकडून काही रक्कम हस्तगत केली. सुरेंद्र यांना ही रक्कम परत करण्यासाठी पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात बोलावले. दरम्यान पोलीस ठाण्यात अधिकारी कार्यालयात नाही हे पाहून याचा फायदा घेत सुरेंद्र ने चक्क पोलीस अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून एक रील तयार केले. 'राणी नही है तो क्या हुआ, ये बादशहा आज भी लाखो दिलों पर राज करता है,' असा व्हिडियो तयार करत त्याने तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

दबंगगिरीचा व्हिडियो इन्स्टाग्रामसह अन्य माध्यमांवर प्रसारित केला. हे रील बनविणे त्याला चांगलेच महागात पडले, पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक देखील करण्यात आली.

Kalyan Crime: ठाकुर्लीचा कथित बादशहा अग्नीशस्त्रांसह अटक
Mumbai Crime: झटपट पैशांसाठी चोरांनी सतरा लाखांचा जेसीबी पळविला

पोलिस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर त्याने आपल्या महागड्या कारच्या बाजूला हस्तकांना घेऊन परवानाधारी रिव्हॉल्व्हर हातात घेऊन नाचगाणी सादर केली. या व्हिडियोंमुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पोलिसांनी गुन्हा नोंदवून सुरेंद्र याला तात्काळ अटक केली होती. या रील स्टार वजा गुन्हेगाराला 18 महिन्यांकरिता तीन जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आले होते. तरीही तो शहरात दाखल झाला होता. अखेर खंडणी विरोधी पथकाने अग्नीशस्त्र साठ्यासह त्याला जेरबंद करण्यात यश मिळविले.

सुरेंद्रकडून यापूर्वी देखिल बंदूक, 5 जिवंत काडतुसे, आदी 55 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. परवानाधारी रिव्हाॅल्वरचा दुरूपयोग केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याच्यावर आतापर्यंत7 गुन्हे दाखल असून खंडणी विरोधी पथकाने हा 8 वा गुन्हा नोंद केला आहे.

Kalyan Crime: ठाकुर्लीचा कथित बादशहा अग्नीशस्त्रांसह अटक
Mumbai Crime : लहान मुलीचे हातपाय बांधले तोंडात कापडाचा गोळा कोंबला...नंतर घरात केली चोरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com