
डोंबिवली, ता. 22 - नांदिवली येथील श्री बालचिकित्सा क्लिनिक मध्ये डॉक्टरांच्या केबिनमध्ये घूसणाऱ्या व्यक्तीला आत जाऊ नका, आत लोक आहेत असे सांगताच त्या व्यक्तीने 25 वर्षीय तरुणीला बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. गोकुळ झा असे मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात गोकुळ झा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.