
कल्याणमध्ये एका धक्कादायक घटनने खळबळ उडाली आहे. एका खाजगी वसतिगृहात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसतिगृहातील मुलांना मारहाणही झाल्याचे जिल्हा महिला बाल कल्याण समितीने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. या प्रकरणी पसायदान नावाच्या खाजगी वसतिगृहाच्या संचालकांसह पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.