कल्याण : 'त्या' प्रकरणाचा पर्दाफाश; मुलानेच केली पित्याची हत्या

मुलाचा बनाव 24 तासात उघड
murder
murdersakal media

डोंबिवली : कल्याणच्या (Kalyan crime update) चिकनघर परिसरात हत्ये प्रकरणी मोठा उलगडा झाला आहे. लोकेशनेच पिता प्रमोद (son kills father) यांची हत्या केल्याचे पोलीस तपासात (police investigation) उघड झाले आहे. एवढेच नाही तर मध्ये पडणाऱ्या आईलाही त्याने जखमी (Mother injured) केले. आईला व मुलाला जखमी करत पित्याने आत्महत्या केल्याचा बनाव लोकेशने रचला होता. मात्र पोलिसांनी तपास करत 24 तासात लोकेशचा बनाव उघड पाडला आहे. आरोपी जखमी मुलगा लोकेश आणि जखमी आई या दोघांच्या वर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरु आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी लोकेशच्या विरोधात हत्या आणि हत्येचा प्रयत्न या आरोपाखाली गुन्हा दाखल (Police FIR) केला आहे.

murder
राज्यात ओमिक्रॉनचे आणखी 2 रुग्ण; जाणून घ्या सविस्तर माहिती

कल्याण पश्चिमेतील निखिल हाईट्स सोसायटी मध्ये प्रमोद बनोरीया यांचा मृतदेह घरात सापडल्याने व मुलगा व पत्नी जखमी अवस्थेत आढळून आल्याने एकच खलब उडाली होती. वडिलांनी मुलगा लोकेश व पत्नी कुसुम यांना जखमी करत आत्महत्या केल्याची माहिती लोकेशने पोलिसांना दिली होती. मात्र पोलिसांनी शिताफीने तपास सुरू केला. लोकेशची आई शुद्धीवर आल्यानंतर तिने घडलेली घटना सांगितली व या प्रकरणाचा उलगडा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

गेल्या आठ दिवसापासून मुलगा आणि वडिल दारु पीत होते. दोघांमध्ये वारंवार वाद होत होता. घटनेच्या दिवशी दोघांमध्ये जोरदार वाद झाला या कौटुंबिक वादातून लोकेश याने वडिलांवर चाकूने हल्ला करत त्यांची हत्या केली. याच दरम्यान लोकेशची आई मध्ये आली तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तिच्यावर ही लोकेश ने चाकूने हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली त्यानंतर लोकेश ने स्वतःवर वार करून घेतले. स्वत:चा गुन्हा लपविण्यासाठी लोकेश याने वडिलांनी त्याच्यावर व त्याच्या आईवर चाकूने हल्ला करत आत्महत्या केल्याचे सांगितले होते.

दोन दिवस मृतदेहासोबत घरातच होता मुलगा

शुक्रवारी दुपारी लोकेशन वादातून वडिलांवर चाकू हल्ला केला. त्यानंतर दोन दिवस तो मृतदेह घरात ठेवून तसाच वावरत होता. आपण पकडले जाऊ या भीतीने त्याने पुढे वॉचमनला फोन करून रुग्णवाहिका बोलावून बनाव रचला होता ही बाबही पुढे आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com