कल्याण : रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने हत्या; गुन्हा दाखल| kalyan crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

कल्याण : रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने हत्या; गुन्हा दाखल

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण (kalyan) पश्चिमेतील उंबर्डे गावात (umbarde village) शनिवारी पहाटे अभिमान भंडारी (वय 51) (Abhiman bhandari) या रिक्षाचालकाची (Rikshaw driver murder) धारदार शास्त्राने हत्या करण्यात आली आहे. सार्वजनिक शौचालयात शौच करण्यास गेलेल्या अभिमान यांची हत्या झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस (Khadakpada police) ठाण्यात गुन्हा दाखल (police FIR) करण्यात आला आहे.

हेही वाचा: हॉटेलच्या खोलीत कोल्हापुरच्या बिझनेसमॅनला असं अडकवलं हनीट्रॅपमध्ये

कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावात राहणारे रिक्षाचालक अभिमान हे शनिवारीपहाटे 4 च्या सुमारास नेहमीप्रमाणे घराबाहेर गावातील सार्वजनिक शौचालयात शौच करण्यासाठी गेली होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या करून तेथून पळ काढला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अभिमान यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत गुन्ह्याची नोंद केली आहे. ही हत्या कोणत्या कारणावरून झाली तसेच मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.

loading image
go to top